दुर्लक्षित झालेल्या पिंपळगाव माळवी तलावाचे भाग्य पालटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तेथील गंज चढलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेची आज महापौर शीला शिंदे यांनी आमदार अनिल राठोड व अन्य काही मनपा पदाधिकारी, अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली.
ही यंत्रणा सुरू करता येईल का, केली तर किती खर्च येईल याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सर्वश्री संभाजी कदम, अनिल लोखंडे, संजय शेंडगे, माजी नगरसेवक अनिल शिंदे, रविंद्र चव्हाण, यंत्र अभियंता परिमल निकम यावेळी उपस्थित होते.
सध्याची मुळा धरणावरची पाणी योजना सुरू होण्यापुर्वी नगर शहराला याच तलावातून पाणी पुरवठा होत होता. त्यासाठी पाईललाईन, पंपीगस्टेशन अशी सर्व यंत्रसामग्री होती. नवी योजना सुरू झाल्यावर तत्कालीन नगरपालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनाही या सर्व महत्वाच्या सामग्रीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे यंत्रांना गंज चढला, पाईप फुटले, लोखंडी साहित्य लोकांनी चोरून नेले अशी सर्व दुरवस्था झाली. तलावातही फार मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला व त्याची साठवण क्षमता कमी झाली.
मध्यंतरी नगरसेवक संभाजी कदम यांनी मनपाने या योजनेचे पुनरूज्जीवन करावे अशी जाहीर मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आज महापौर श्रीमती शिंदे व आमदार राठोड यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली. तलाव ते मनपाची मुख्य टाकी असलेल्या वसंत टेकडीपर्यंतचे अंतर फक्त १२ किलोमीटर आहे. त्यामुळे या अंतरात पाइपलाइन बसवली तर मनपाला त्यातून पाणी मिळू शकते असे या वेळी सांगण्यात आले. याबाबत अभ्यासपूर्वक माहिती जमा करून अहवाल तयार करावा व निधीसाठी सरकारकडे पाठवण्याची कार्यवाही करावी असे महापौरांनी या वेळी सांगितले.
पिंपळगाव तलाव वापराच्या मनपात हालचाली
दुर्लक्षित झालेल्या पिंपळगाव माळवी तलावाचे भाग्य पालटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तेथील गंज चढलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेची आज महापौर शीला शिंदे यांनी आमदार अनिल राठोड व अन्य काही मनपा पदाधिकारी, अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली.
First published on: 01-06-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement for using pimpalgaon lake in mnc