लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या गाजलेल्या ‘फकिरा’ कादंबरीवर लवकरच चित्रपट काढण्यात येणार असल्याची माहिती अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली. चित्रपट तयार करण्यापूर्वीच त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे आशीर्वाद व शुभप्रतीक आहे, असेही ते म्हणाले. अण्णा भाऊंचे साहित्य माणसांची मने जोडणारे आहे, असे मत समाजकल्याणमंत्री शिवाजीराव मोघे यांनी याच समारंभात बोलताना व्यक्त केले.
बहुजन विकास आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना मोघे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी अण्णा भाऊंच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री रमेश बागवे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी, कल्पना कपिले, बाळासाहेब चव्हाण, डॉ. दत्तात्रय गायकवाड, धनाजी विनोदे, संजय धुतडमल, बाळासाहेब तरस, संजय िपजण, श्याम भोसले आदी उपस्थित होते. प्रास्तविक धुतडमल यांनी केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित चबरे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा