२०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षासह विविध प्रस्थापित असलेल्या राजकीय पक्षांनी बुथ पातळीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी विदर्भाचे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार आहे. आमदारांच्या दौऱ्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भातील विविध जिल्ह्य़ात दौरा करणार आहेत.  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी दौऱ्यांदरम्यान करण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फारसे यश मिळाले नव्हते. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फारसे अस्तित्व आणि कार्यकत्यार्ंचे संघटन नसताना गेल्या चार वर्षांपासून विदर्भातील कार्यकत्यार्ंनी पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही ठराविक जिल्ह्य़ात जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाले असले तरी तेवढय़ावर समाधानी राहून चालणार नाही, असे निर्देश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे कार्यकत्यार्ंनी आता प्रत्येक जिल्ह्य़ात संघटन बांधण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे. राज्यातील विविध भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार विदर्भातील विविध जिल्ह्य़ात दौरे करणार आहेत.
विदर्भाचे संपर्कमंत्री पराग प्रधान आणि अविनाश जाधव पूर्व विदर्भाच्या दौऱ्यांवर असून ते कार्यकत्यार्ंच्या बैठका घेत आहेत. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात दौरे करणार असल्याचे सांगितले होते. शिवाय मनसेचे सर्व आमदार टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्य़ात जाऊन पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंच्या भेटी घेऊन संघटन बाधणी मजबूत करतील. पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्य़ात बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आदी प्रमुख मनसेचे आमदार आणि पदाधिकारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील आमदारांच्या दौऱ्यानंतर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी व आमदार यांची मुंबईला विदर्भाच्या प्रश्नांवर बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. विदर्भातील काही ठराविक जिल्ह्य़ात राज ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार असून त्या दृष्टीने कार्यकत्यार्ंना सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader