* संप कायम राहिल्यास शहरात रोगराई पसरणार
* बनावट देयके काढल्याने वेतन रखडले
मनपातील कर्मचाऱ्यांना गेल्या ५ महिन्यांपासून वेतन नाही, ही गंभीर बाब असून सत्तारूढ भारिप व काँग्रेसने मनपाचा सत्यानाश केला आहे, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. मात्र, भाजपा या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना त्यांचे पूर्ण वेतन मिळण्यासाठी भाजपाचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे व आमदार डॉ.रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे शहर भाजपाध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांनी सांगितले. मनपातील या संपाला सत्तारूढ काँग्रेस व भारिप बमसंची आघाडी कारणीभूत आहे. या संपाला तेच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपाध्यक्षांनी केला आहे. मनपातील सत्तारूढ घटकाच्या कामाची श्व्ोतपत्रिका काढण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान, आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त् यांची भेट घेतली व त्यांना एक निवेदन दिले. मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५० कोटी रुपयांचा विशेष निधी शासनाने द्यावा व मुख्यमंत्र्यांनी आपले पालकत्व सिद्ध करावे, असे आवाहन आमदार शर्मा यांनी केले आहे. त्यांनी थेट मंत्रालय गाठले व मनपामध्ये आयुक्त नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या कारभारात अनागोंदी माजली आहे, असे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सांगितले. मनपा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपण अकोल्याचे पालकत्व स्वीकारू, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण गोवर्धन शर्मा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना करून दिली व आता आपण पालकत्व सिद्ध करा, असे आवाहनही केले. कर्मचारीही अक ोलेकर असून सरकारने या कठीण काळात त्यांना मदत द्यावी. गेल्या ५ महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना दुकानदार माल उधार देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे सांगून आमदार म्हणाले की, मनपाची प्रतिमा अतिशय खराब झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे पाणी, आरोग्य, साफसफाई ठप्प झाली आहे. पाणी पुरवठा न झाल्यास नागरिकांचा असंतोष भडकेल, परिणामी शहराची शांतता भंग पावेल. शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, तसेच शहराला एक सक्षम आयुक्त व पुरेसे कर्मचारी द्यावे, अशी मागणी एका निवेदनातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली. शहरात भाजप शिष्टमंडळाने मनपा कर्मचारी व प्रशासनाची भेट घेऊन या संपा बाबत लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. बनावट देयके काढण्याचा प्रताप सत्तारूढ महाआघाडीने केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आफत ओढवली आहे, असा आरोप भाजपा शहर अध्यक्ष ओळंबे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा