आशियातील सर्वात जुने ‘स्टॉक मार्केट’ असलेल्या ‘मुंबई स्टॉक मार्केट’मध्ये (बीएसई) आता मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या भांडवली बाजाराचा इतिहास उलगडला जाणार आहे. दलाल मार्गावरील बीएसईच्या इमारतीत संग्रहालय उभारण्याचा विचार सुरू आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास शिल्पकला, दस्तावेज व चित्रांच्या माध्यमातून बीएसईचा इतिहास खुला होईल. मुंबईचे स्टॉक मार्केट तब्बल १३८ वर्षे जुने आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या संबंधातील योजना अत्यंत प्राथमिक पातळीवर आहे. त्याकरिता संबंधितांकडून सूचना मागवीत आहोत. सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर या संबंधातील योजना कार्यान्वित होईल,’ असे बीएसईतील सूत्रांनी सांगितले. या संग्रहालयात मॉडर्न आर्टवर आधारित शिल्प, दस्ताऐवज आणि चित्रे असतील. गेल्या १३८ वर्षांतील भांडवली बाजाराचा आढावा यातून घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
३१ ऑगस्ट १९५७ ला सरकारच्या ‘सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन अ‍ॅक्ट’नुसार बीएसईला मान्यता मिळाली. १९८० मध्ये दलाल मार्गावरील ‘फिरोज जिजिभॉय टॉवर्स’ येथे बीएसईचा कारभार हलविण्यात आला. १९९० मध्ये ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ची (एनएसई) स्थापना झाल्यानंतर बीएसईचे महत्त्व कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.
मात्र नंतरच्या काळातही या ठिकाणाहून होणारा व्यापार कमी झाला नाही. त्यामुळे अजूनही इथल्या ‘सेन्सेक्स’वर परदेशी गुंतवणूकदारांची बारीक नजर असते. या ठिकाणी सर्वाधिक ५,३०० कंपन्यांनी नोंदी केल्या आहेत. हा आकडा जगभरातील भांडवली बाजारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. बीएसईच्या इमारतीत अनेक मोकळे मजले आहेत. या ठिकाणी संग्रहालय तयार करण्याचा विचार आहे. मात्र त्याकरिता मुंबई महानगरपालिकेची परवानगी लागणार आहे.