तणाव आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील वांद्रे परिमंडळातील २५ टक्के पोलिसांनी कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. कॅन्सर पेशंटस असोसिएशनच्या वतीने मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमधील कर्करोग शोधण्यासाठी तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. वाद्रे परिसरातील २७ पोलीस ठाण्यातील १८५ पोलिसांची तपासणी केली असता ७५ टक्के पोलीस कर्मचारी तंबाखू सेवनाची सवय असल्याचे दिसून आले. तर त्यापैकी २५ टक्के पोलिसांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आलेली आहेत. पोलिसांमधील कर्करोगाचे प्रमाण ही गंभीर बाब असून आता या पोलिसांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. प्रत्येक तीन आणि सहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सीपीएच्या संचालिका अनिता पीटर यांनी सांगितले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा