हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली   असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी अलीकडे दिली.   सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी लिहिलेल्या ‘खाकी में इन्सान’ या पुस्तकाचे शासनाच्या   जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक गणेश रामदासी यांनी ‘खाकीतील माणूस’ या शीर्षकाखाली केलेल्या मराठी भाषांतरित पुस्तकाचे डॉ. सिंह यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Story img Loader