संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील ‘निर्भया’ला श्रध्दाजंली वाहण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. त्यानिमित्ताने ‘निर्भया’च्या प्रथम स्मृतिदिनी महाविद्यालयांमध्ये एकदिवसीय कार्यशाळा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. प्रगल्भ व संपन्न राष्ट्र उभारणीसाठी तसेच सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण ही काळाची नितांत गरज आहे. हीच गरज विद्यापीठातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना त्यांचे हक्क आणि कर्तृत्वाची जाणीव करून देण्यावर या कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळांची सुरुवात १६ डिसेंबरला विद्यापीठात होणार आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या त्या काळरात्रीला एक वर्ष पूर्ण होत आहे.
मुंबई विद्यापीठ वाहणार ‘निर्भया’ला श्रद्धांजली
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील ‘निर्भया’ला श्रध्दाजंली वाहण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. त्यानिमित्ताने ‘निर्भया’च्या प्रथम
First published on: 21-11-2013 at 08:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university paying tributes to nirbhaya