व्यंगचित्रकार हा काहीवेळा संपादकापेक्षाही अधिक महत्त्वाचा ठरतो. आर. के. लक्ष्मण यांनी तर राजकीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आपल्या कुंचल्यातून भाष्य करत हे गुंतागुंतीचे विषय सर्वसामान्यांना अत्यंत सहजतेने उलगडून दाखवले, असे गौरवोद्गार राज्यपाल के. शंकरनारायण यांनी लक्ष्मण यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना काढले.

पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे आणि व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते नुकतेच झाले.

भारतातील नामवंत कलावंतांच्या कलाकृतींचा पुन्हा एकदा आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या ‘इंडियन मास्टर्स रेट्रोस्पेक्टिव्ह’ या मालिकेत वरळी येथील नेहरू केंद्राच्या कलादालनात यंदा लक्ष्मण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले आहे. पाच जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले राहील.

बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते विद्यमान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, प्रख्यात गायिका लता मंगेशकर अशा नामवंतांच्या रेखाटनांसह लक्ष्मण यांची गाजलेली व्यंगचित्रे या ठिकाणी आहेत.

Story img Loader