ग्राहकाच्या वीज मीटरचे वाचन न करताच अव्वाच्या सव्वा रकमेची देयके पाठवून ग्राहकांना मनस्ताप देणे, अनियमितपणे देयके पाठविणे, शहानिशा न करता वीजपुरवठा खंडीत करणे, अशी दंडेलीशाही वीज वितरण कंपनीने सुरू केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी करून ग्राहकांच्या हक्कासाठी आगळेवेगळे मुंडन आदोलन केले. शेवटी वीज वितरण कंपनीचे प्रशासन नमले. आंदोलनकर्त्यांंच्या मागण्या निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासमोर कंपनीचे प्रभारी अधीक्षक अभियंत्यांनी मान्य केल्या.
मुंडन आंदोलनाचे नेतृत्व दत्ता कुळकर्णी, प्रशांत उर्फ बापू दर्यापूरकर, अविनाश धनेवार, कैलास अजमिरे यांनी केले. त्यापूर्वी या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ग्राहकांना विजेची देयके नियमित पोहोचविणे, रििडगपणे देयक देणे, अवाजवी देयके मिळाल्यास नियम २००३ प्रमाणे जोपर्यंत ग्राहकांचे देयकाबाबत समाधान होत नाही तोपर्यंत त्याला आलेल्या देयकातील दुरुस्ती झाल्याशिवाय विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही व फिडरनिहाय भारनियमन त्वरीत कमी करू, तसेच गळतीवर पायबंद लावू, असे आश्वासन प्रभारी अधीक्षक अभियंता पंकज तगडपल्लेवार यांनी दिले. यावेळी कंपनीचे कार्यकारी अभियंता मडावी व अभियंता चेले हेही उपस्थित होते. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी एम.एच. राठोड यांना शिधापत्रिकेसंदर्भातील अडचणी विशद करण्यात आल्या.
पसे घेऊन शिधापत्रिका कशी मिळते, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर योग्य ती कारवाई करू व सीसीटीव्ही कॅमेरे बसवू, असे आश्वासन त्यांनी दिले. निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी झालेल्या चच्रेत उपोषणकर्त्यांंसोबत योगेश गढीया, अमोल देशमुख, कमल मिश्रा, देविदास अराठे, नामदेवराव दोनाडकर, अमन निर्वाण, गुड्डू, सुहास सावरकर, विजू भूसेवार, राधेश्याम निमोदिया, राजू जेकब, अंतुल संगीतराव, अरुण जोग, खत्री, मनीष शर्मा आदींनी भाग घेतला.
महावितरणविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे मुंडन आंदोलन
ग्राहकाच्या वीज मीटरचे वाचन न करताच अव्वाच्या सव्वा रकमेची देयके पाठवून ग्राहकांना मनस्ताप देणे, अनियमितपणे देयके पाठविणे, शहानिशा न करता वीजपुरवठा खंडीत करणे, अशी दंडेलीशाही वीज वितरण कंपनीने सुरू केल्याचा
First published on: 26-04-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mundan andolan by social workers against mahavitran