पालिकेमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत असतात आणि कामे रखडून त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने आधी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवावा आणि मग व्यवसाय सुलभतेचा विचार करावा, उपदेशाचा डोस हाणत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केले.
जागतिक बँकेच्या सूचनेनुसार महापालिकेने आपली जाचक परवाना प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी लागणारा कालावधी, पद्धती व तो मिळविण्यासाठी लागणारा खर्च या बाबींचा विचार करू. ‘इझी टू डुइंग बिझनेस’ हे धोरण आखण्यात आली आहे. या धोरणामुळे झटपट परवाने मिळतील आणि प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.
पालिकेने व्यवसाय सुलभता आणण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर लक्ष द्यावे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात आलेले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पालिकेच्या कामामुळे नुकसान झाले. तेथील रेन वॉटर हार्वेस्टिंगची दुरुस्ती करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली. मात्र याबाबतची फाइल एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे फिरत आहे. पावसाळा जवळ आला तरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या दुरुस्तीच्या फाइलचा प्रवास संपलेला नाही. कामात दिरंगाई करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता बदला, मग झटपट कामे होतील, असा उपदेशाचा डोस मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला दिला.
प्रत्येक गोष्टीसाठी सल्लागार नेमण्याची प्रशासनाला सवय झाली आहे. आता अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सल्लागार नेमावा, असाही टोला त्यांनी हाणला. इतर नगरसेवकांनीही संदीप देशपांडे यांच्या मुद्दय़ांना पाठिंबा देत प्रशासनावर टीका केली.
आधी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलामग व्यवसाय सुलभतेचा विचार कर
पालिकेमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांच्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत असतात आणि कामे रखडून त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसतो.
First published on: 01-05-2015 at 12:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal administration should change officers mentality says corporators