महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी ३१ मार्चपर्यंत किमान २१० कोटींची कर वसुली करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण क रण्याचे निर्देश मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. आतापर्यंत म्हणजे १८ मार्चपर्यंत कर व कर आकारणी विभागाची १५६ कोटींची वसुली झाली आहे.
महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवनात नुकतीच वर्धने यांच्या अध्यक्षतेखाली कर व कर आकारणी विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यात शहरातील सर्व झोनचा आढावा घेतला गेला. ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. वसुलीच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा वर्धने यांनी दिला. वसुलीसाठी १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे त्यानुसार वसुलीचे नियोजन करण्याची सूचनाही वर्धने यांनी दिली.  धंतोली झोनने मार्चपूर्वीच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल झोनच्या अधिकाऱ्यांचे वर्धने यांनी अभिनंदन केले. ५० टक्केपेक्षा कमी वसुली असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वर्धने यांनी दिला. या बैठकीला अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, करनिर्धारक शशिकांत हस्तक, करअधीक्षक डी.एम. उमरेडकर, सहायक कर निर्धारक निरीक्षक यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Story img Loader