सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या शाळेचे बांधकाम अपूर्ण असताना ते पूर्ण केल्याचे दाखवत कोटय़वधी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नगरसेविका आभा पांडे यांनी सभागृहात केला. महापौर अनिल सोले यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पुढच्या सभागृहात सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेचे बांधकाम व विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक विकासासाठी निधी मिळतो. २००४-०५ पासून हा निधी मिळत आहे. मात्र, २०११मध्ये महापालिकेने यासाठी नियमावली तयार केली. त्यानुसार मोठय़ा बांधकामासाठी झोन कार्यालयामार्फत निविदा काढून काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. आभा पांडे यांनी कागदपत्राच्या आधारे यात कोटय़वधीच्या गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला. प्राप्त निधीपेक्षा जास्त रक्कम या कामावर खर्च करण्यात आली आहे. ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून देण्यात आली आहे. सर्व पैसा कंत्राटदाराला देण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत काम पूर्ण झाले नाही. काही ठिकाणी बांधकाम कमी करण्यात आले. हिंदी मोर उच्च प्राथमिक शाळेत पाच खोल्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र या तीनच खोल्यांचे बांधकाम करण्यात आले. एका शाळेत शौचालयाचे बांधण्यात करण्यात आले नसतानाही त्याचे पैसे लाटण्यात आले. १७ शाळांमध्ये बांधकाम अपूर्ण असताना पैसा मात्र पूर्ण देण्यात आला. यावर मंजूर निधीपेक्षा २३ लाख रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले. तर २१ शाळेवर ६५ लाखाच्याजवळ अतिरिक्त निधीपेक्षा २३ लाख रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आला असून काम अपूर्ण असल्याचे त्यांनी
सांगितले.
प्रशासनाला याची चाहुल लागल्याने अशा प्रकरणात संबंधिताविरोधात पोलीस तक्रार केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि या प्रकरणात सारवासारव केली. या प्रकरणासंदर्भात महापौर सोले यांनी चौकशीचे आदेश देत पुढच्या सभेमध्ये अहवाल ठेवावा, असे निर्देश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा