शेतात खळय़ावर झोपेत असताना शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृताचा चुलत भाचा नवनाथ दुधभाते यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे हा प्रकार घडला. सुधाकर शिवमूर्ती घोडके (वय ५०, इटकळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात सध्या तुरीची रास सुरू असल्यामुळे ते रोजच्या प्रमाणे बुधवारी रात्री तुरीच्या खळय़ावर झोपण्यास गेले होते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कपाळावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करून ठार केले. रोज सकाळी सात वाजता अंघोळीसाठी घराकडे येणारे आपले वडील सकाळी आठ वाजले, तरी का आले नाहीत, म्हणून घोडके यांचा मोठा मुलगा प्रवीण शेतात गेला. तेथे वडिलांना आवाज दिला. परंतु ते उठत नसल्याने त्याने त्यांच्या अंगावरील पांघरूण काढले असता, त्यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचे दिसून आले.
झोपेत असताना शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून
शेतात खळय़ावर झोपेत असताना शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृताचा चुलत भाचा नवनाथ दुधभाते यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
First published on: 18-01-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of farmer osmanabad