सुरेश पांडुरंग अहिरे (वय ५०, रा. ३१, चिमणपुरा, मांढरे आळी, सातारा) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. आज दुपारी ३ वाजता व्यावसायिक काम संपल्यानंतर ते साता-यातील राजधानी टॉवर येथील कल्पना हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्याबरोबर दोघेतिघे होते. त्यांच्या चच्रेनुसार आíथक देवाणघेवाणीचा वाद होऊन ३.३५ मिनिटांनी ते हॉटेलमधून बाहेर पडले त्या वेळी त्यांच्यावर चाकूहल्ला झाला. त्यांच्या छातीवर चार वार झाल्यामुळे ते खाली पडले. त्या वेळी रिक्षा थांब्यावरील बबन झोरे व सतीश लेवे यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुरेश पांडुरंग अहिरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हल्ला करणारे तडीपार झालेल्या गँगशी संबंधित असावेत असा कयास आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर दरेकर करत आहेत.
साता-यात भरदिवसा दूध व्यावसायिकाचा खून
सुरेश पांडुरंग अहिरे (वय ५०, रा. ३१, चिमणपुरा, मांढरे आळी, सातारा) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. आíथक देवाणघेवाणीचा वाद होऊन ३.३५ मिनिटांनी ते हॉटेलमधून बाहेर पडले त्या वेळी त्यांच्यावर चाकूहल्ला झाला.

First published on: 06-02-2014 at 02:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of milk businessman in satara