डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त समजताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांचे अमेरिकेतील मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले. तेथून ब्लॉगद्वारे त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला आहे. हजारे सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हा पुरोगामी विचारांचाच खून आहे. डॉ. दाभोलकरांशी आपले जवळचे संबंध होते. अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एकत्रपणे चर्चा केल्या. त्यांचा विशिष्ट वर्ग किंवा सांप्रदायाशी कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळाही हजारे यांनी दिला.

Story img Loader