पंढरपूर शहरात स्टेशन रस्त्यावरील फूटपाथावर एका गरीब तरुणाचा अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला. हा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा लगेचच होऊ शकला नाही. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.
बाळासाहेब नारायण शहाणे (वय ३०, रा. मळद, ता. दौंड) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मृत शहाणे हा पंढरपुरात सोमनाथ मुकुंद उंबरे यांच्या वडापाव विक्रीच्या गाडीवर काम करीत असे. रात्री उशिरा काम संपल्यानंतर तो स्टेशन रोडकडे गेला. परंतु तेथील फूटपाथवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्रांनी त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला. यासंदर्भात सोमनाथ उंबरे यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.

Story img Loader