‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ या संस्थेतर्फे १६ मार्च रोजी ‘होरी- रंगरंगीली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर आणि त्यांचे विद्यार्थी सहभागी होणार असून हे कलाकार ध्रुपद, होरी, ठुमरी, दादरा, झुला, टप्पा, भजन अशी विविध बाजाची संगीत मैफल रंगविणार आहेत.
हा कार्यक्रम दुपारी ४ ते ७ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे होणार असून महापौर सुनील प्रभु, शिवसनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, गायक-संगीतकार पं. यशवंत देव, पं. शंकरराव अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असला तरी सर्वसामान्य रसिकांसाठीही कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश आहे.  कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रम स्थळी उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

Story img Loader