सातारा शहरात गोळीबारासारखे प्रकार घडत आहेत. गुंडांची दादागिरी वाढली आहे. जनतेच्या हितासाठी मलाच कायदा हातात घ्यावा लागेल, असे सांगून साताऱ्यात फक्त माझीच दादागिरी चालणार असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी व पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. कायदा सुव्यवस्थेवर त्यांच्यात चर्चा झाली.
गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा. तुम्ही दोघे माझे मित्रच आहात. दोघांबद्दल मला आदर आहे. मला जबाबदारीची जाणीव असल्यानेच मी बोलत आहे. पोलीस बळ नसल्याचे सांगत पोलीस खाते गुन्हेगारांना अभय देत आहे. मी आंदोलन केले की माझ्यावर गुन्हे दाखल केले जातात. माझ्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. याबाबत तातडीने कार्यवाही करू असे जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख के. एम. एम प्रसन्ना यांच्याशीही चर्चा केली.

Story img Loader