कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बँक व नाबार्डने १ हजार कोटींचा अर्थपुरवठा शेतकऱ्यांना केला आहे. शेती पाणीपुरवठयासह सहकारी संस्थांना थेट अर्थसाह्य नाबार्डकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी संस्था सक्षम पाहिजेत. कृषी विज्ञान शेतकरी मंडळाने कृषी विभागाच्या या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, असे आवाहन नाबार्डचे सहायक प्रबंधक ए. ए. कांबळे यांनी  आपल्या भाषणात केले.
करवीर तालुक्यातील खुपिरे येथील नाबार्ड योजनेअंतर्गत व केडीसीसी बँकेच्या सौजन्याने नवीन नोंदणी झालेल्या छ. शाह कृषी विज्ञान शेतकरी मंडळाचे उद्घाटन नाबार्डचे सहायक प्रबंधक ए. ए. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी निवृत्ती पाटील (महाराज) तसेच प्रमुख पाहणे म्हणून उमेश पाटील उपस्थित होते.
या वेळी निवृत्ती पाटील, जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक पी. बी. पाटील, रामराव इंगळे, िभगारे, तुकाराम पाटील,
सर्जेराव पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी डी. बी. पाटील, एम.डी. पाटील, मनीषा पाटील, जिल्हा बँकेचे एम. एस. चौगले, बी. आर. पाटील के. डी. पाटील, दाजी पाटील, तसेच मंडळाचे सदस्य आर. एम. भोसले, प्रकाश नाईक, उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सरदार पाटील यांनी तर आभार उपाध्यक्ष दत्तात्रय बोरगे यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा