इस्तंबूल (तुर्कस्तान) येथे १२ ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या नवव्या जागतिक कुराश कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १३ जणांच्या भारतीय संघात नगरच्या अंजली वल्लाकट्टी (देवकर), अंकुश नागर व फैयाज सय्यद या तीन खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय कुराश संघाच्या निवडीसाठी दिल्लीत झालेल्या निवड स्पर्धेत नगरच्या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत प्रथम क्रमांकासह भारतीय संघात स्थान मिळवले. हे तिन्ही खेळाडू सारडा कॉलेजच्या सायंक्रीडा मंडळात सराव करतात. ज्यूदो व ग्रिकोरोमन कुस्तीच्या मिश्रणातून कुराश कुस्ती खेळ विकसित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नगरला दुसरी राष्ट्रीय कनिष्ठ गटाची स्पर्धा आयोजित केली गेली होती.
निवडीबद्दल तिन्ही खेळाडूंचे राज्य संघटनेचे सचिव प्रा. संजय धोपावकर, राज्य अध्यक्ष अब्दुल अजिज, जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी अभिनंदन केले.

Story img Loader