वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात आजपासुन सुरू झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत नगरच्या स्वप्नील चोरडिया याच्यासह संदिप यादव (पुणे), अभिजित वानखेडे (नाशिक), निखिल निंबोरे (अमरावती) आदींनी आजच्या लढतींत प्रतिस्पध्र्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज सायंकाळपर्यंत उपउपांत्य फेरीच्या लढती रंगल्या. दिवसभरात ४८ लढती झाल्या.
संकुलातील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. तत्पूर्वी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली व उद्घाटनप्रसंगी सत्कार समारंभास फाटा देण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू शेख उस्मान शेरु याने सहभागी खेळाडूंना शपथ दिली. जिल्हा क्रीडा परिषद, राज्य व जिल्हा बॉक्सिंग संघटना यांनी या स्पर्धा भरवल्या आहेत.
व्यंकेश्वर, प्रा. रंगनाथ डागवाले, अर्जुन पुरस्कार विजेते व महाराष्ट्र पॅराऑलिंम्पिक संघटनेचे अध्यक्ष विजय मनेश्वर, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार आदींची भाषणे झाली. राज्य बॉक्सिंग  संघटनेचे सचिव भरत वाव्हळ यांनी आभार मानले. जिल्हा सचिव गफार शेख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य भट, कर्नल परब, राजन गोथडी, शकिल शेख, भाऊराव वीर, अरुण बुटे, राजेंद्र कोहकडे आदी उपस्थित होते.
मुलांच्या १४, १७ व १९ वयोगटातील स्पर्धा दि. २२ पर्यंत चालतील, त्यात सात विभाग व क्रीडा प्रबोधिनींचे विविध वजनगटातील संघ सहभागी झाले आहेत. दि. २३ व २४ रोजी मुलींच्या १७ व १९ वयोगटातील स्पर्धा होतील. स्पर्धेतून बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचा राज्य संघ निवडला जाईल.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा