नागपूर ते छिंदवाडा या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याची तयारी सुरू झाली असून परिणामी हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे दोन वर्षे बंद राहणार आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडापर्यंत १४८ किलोमीटर अंतर पार करायला या गाडीला पावणे सात तास लागत असले तरी गाडीला नेहमीच गर्दी असते. छोटी लाईन अशी ओळख असलेल्या या रेल्वे मार्गावर रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते.
प्रवाशांची गरज लक्षात घेता दोन वर्षांपूर्वी या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले. त्यानंतर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. ब्रॉडगेजच्या कामाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष कामास पुढील महिन्यात प्रारंभ होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात छिंदवाडा ते सौंसरदरम्यान काम केले जाईल. या कामास एक वर्ष कालावधी लागू शकतो. दुसऱ्या टप्प्यात सौंसर ते नागपूरदरम्यान काम होईल. त्यासही एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. विनाअडथळा काम झाल्यासच दोन वर्षांत संपूर्ण काम होऊन रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो.
पहिल्या टप्प्यात सौसपर्यंत गाडी सुरू ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. छिंदवाडय़ास जाण्यासाठी सौंसपर्यंत रेल्वेने जाऊन तेथून पुढे बसने जाता येईल. सौंसरपासून काम सुरू झाल्यानंतर छिंदवाडा ते सौंसर अशी गाडी सुरू होण्याची शक्यता फारच मी दिसते. संपूर्ण ब्रॉडगेज झाल्यानंतर एकदम नवी गाडी सुरू होईल. त्यामुळे दोन वर्षे प्रवाशांच्या सोयीसाठी हा रेल्वे मार्ग बंद राहू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा