आमदार सुनील केदार आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक रोखे घोटाळ्याची कागदपत्रे आपल्याकडे असून, सर्व कागदपत्रे त्या बँकेतच आहेत, अशी माहिती चौकशी अधिकारी यशवंत बागडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळ्याची चौकशी सर्वप्रथम यशवंत बागडे यांनी केली. परंतु त्यांच्या अहवाल राज्य सरकारने फेटाळाला. त्यानंतर केदार व इतर आरोपींची मालमत्ता विक्री करून रक्कम वसूल करण्याची विनंती करणारी जनहित याचिका ओमप्रकाश कामडी आणि इतर दोन शेतकऱ्यांनी केली. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने सहा महिन्यांत सहकार कायद्यानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. खरवडे यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, चौकशी अधिकारी खरवडे यांनी चौकशीत शासन आणि यापूर्वीचे चौकशी अधिकारी बागडे सहकार्य करीत नाहीत, असा अर्ज न्यायालयात दाखला केला होता.
या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने शासन आणि बागडे यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज बागडे न्यायालयात हजर होते. बँकेचा चौकशी अहवाल माझ्याकडे नाही. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे संबंधित बँकेत आहेत. मी आजारी आहे. शासनाने चौकशी करण्याबद्दल मोबदलादेखील अद्याप दिलेला नाही, असे बागडे यांनी न्यायालयाला सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur district bank