मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विदर्भ साहित्य संघ, जिल्हा माहिती कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान नागपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनात हा तीन दिवसांचा कार्यक्रम होणार आहे.
२५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून ४ वाजता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार कार्यक्रमाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग व मराठी भाषा विभागाच्या विभागीय सहायक संचालक आ.अ. दिवाण
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी ६ ते ८ दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
२६ फेब्रुवारीला सकाळी १०.३० ला मराठी भाषा लेखन व वाचन विचार या विषयावर भाषातज्ज्ञ दीपक रंगारी मार्गदर्शन करतील तर प्रकाश दुलेवाले सूत्रसंचालन करतील. याच दिवशी मराठी अध्यापनातील माझे अनुभव चिंतन, विद्यार्थी शिक्षक कवीसंमेलन, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील तसेच सायंकाळी ६ वाजता पोस्टर ही एकांकिका सादर होईल. लालबहादूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संजय गायकवाड यांनी या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
२७ फेब्रुवारीला सकाळी १०.३० ला कथाकथन व दुपारी ३ वाजता डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा मिर्झा एक्सप्रेस हा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी तर कादंबरीकार शुभांगी भडभडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
आमदार नागो गाणार अध्यक्षस्थान भूषवतील. तीन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2015 रोजी प्रकाशित
नागपूर ग्रंथोसव आजपासून
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विदर्भ साहित्य संघ, जिल्हा माहिती कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान नागपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 25-02-2015 at 08:44 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur granth utsav