शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची ८२९ पदे मंजूर असताना त्यापैकी २०९ पदे रिक्त आहेत. मेडिकलमधील ५० वार्डात रुग्णसेवा देण्यासाठी अवघ्या ६२० परिचारिका सद्यस्थितीत कार्यरत आहेत.
परिचारिकांची पदे भरण्यासंदर्भात वैद्यकीय विभागाने अनेकदा आश्वासने दिली मात्र पदे भरण्यात आली नाही. परिचारिकांची अनेक प्रकारची पदे शासनाने मंजूर केली आहेत. रुग्णसेवेचे व्रत नित्याने सेवाधर्म परिचारिका निभावत असतात. त्या स्वत: आजारी असल्यावरही संख्या कमी असल्याने त्यांना सेवेवर यावे लागते. परिचारिकांची २०९ पदे मेडिकलमध्ये रिक्त असताना रुग्णसेवेचे व्रत त्या सांभाळतात. हे काम करताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आधुनिक ‘फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ची २०९ पदे रिक्त असूनही मेडिकल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एकही परिचारिकेचे पद रिक्त नसल्याचा दावा मेडिकलचे प्रशासन करत आहे. मात्र महिला दिनाच्या पर्वावर परिचारिकांनीच हा दावा खोटा ठरविला आहे.
 मेडिकलमधील आरोग्य व्यवस्थेच्या वाटेवरील अडचणी दूर करण्यासाठी परिचारिका नित्यनेमाने सेवाधर्म पार पाडत आहे. पूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात अधिसेविका(वर्ग-१), अधिसेविका (वर्ग-२), सहायक अधिसेविका, पाठय़निर्देशिका लोकस्वास्थ्य, परिचारिका, बालरुग्ण परिसेविका, मनोरुग्ण परिसेविकाविभागीय परिसेविका आणि अधिपरिचारिकांची ६८७ पदे मंजूर होती; परंतु शासनाने २ एप्रिल २०१२ ला वाढ करूनही संख्या ८२९ पदे निर्माण झाली. केवळ ६२० परिचारिकांवर मेडिकलमध्ये रुग्णसेवेचा भार आहे. नवीन विभाग दर दिवसाला मेडिकलमध्ये तयार होत असताना परिचारिकांची पदे मात्र भरली जात नसल्याची टीका महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. अधिपरिचारिकांची मंजूर संख्या ६५१ एवढी प्रत्यक्ष वार्डामध्ये रुग्ण सेवेसाठी असून फक्त  ४९५ पदे भरली आहेत. बाकी १५६ अधिपरिचारिकांची पदे रिक्त आहेत.
रुग्णसेवेवर रिक्त पदांचा परिणाम -मून
सुमारे ५० वार्ड मेडिकलमध्ये रिकव्हरी वार्ड, प्रसूतिशास्त्र, अतिदक्षता विभाग, आपतकालीन विभाग, नवजात अर्भक अतिदक्षता विभासह सुपरमध्ये प्रतिनियुक्ती लर्सि कॉलेज मध्ये प्रतिनियुक्ती देऊन अधिपरिचारिकांची संख्या कमी झाली रुग्णसेवेवर परिचारिका कमी असल्याने त्याचा परिणाम होत आहे. ही सर्व पदे शासनाने तातडीने भरावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस् फेडरेशन नागपूरच्या अध्यक्ष यशोधरा मून यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा