पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कस्तुरचंद पार्क तसेच मौदा येथे येणार असून त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. दोनही कार्यक्रमस्थळी जमिनीचे सपाटीकरण तसेच व्यासपीठ उभारले जात आहेत.
मेट्रो रेल्वे तसेच पारडी उड्डाण पुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर होणार असून यावेळी संपूर्ण विदर्भातून एक लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. मौदा येथे एनटीपीसीच्या प्रकल्पाचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तेथेही दहा हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर चार केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री त्याच बरोबर अनेक केंद्रीय व राज्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण असून या कार्यक्रमांसाठी ते युद्धस्तरावर तयारीला लागले आहेत. कस्तुरचंद पार्क तसेच मौदा येथील कार्यक्रमस्थळ व हेलिपॅडची जागा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तेथे चारही बाजूंनी सुरक्षेसाठी चौवीस तास पोलीस तैनात आहेत.
कस्तुरचंद पार्क तसेच मौदा येथील कार्यक्रमस्थळ व हेलिपॅडची जागा स्वच्छ करणे सुरू असून त्याचबरोबर त्याचे सपाटीकरण सुरू आहे. उद्या तेथे हेलिपॅड तयार होईल. दोन्ही ठिकाणी व्यासपीठाची उभारणी उद्या सकाळपर्यंत पूर्ण झालेली राहील. त्यासाठी तेथे मजूर कामाला लागले आहे. एसपीजीसह काही केंद्रीय व राज्याचे अधिकारी येथे येऊन पोहोचले आहेत. पंतप्रधानांसाठी वाहनेही आली आहेत. उद्या आणखी वरिष्ठ अधिकारी नागपुरात पोहोचतील. उद्या दोन्ही ठिकाणी रंगीत तालीम घेतली जाईल. दुपापर्यंत व्यवस्थेचा अंतिम आढावा घेतला जाईल. आज दुपारी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांच्यासह नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी कस्तुरचंद पार्कची पाहणी केली आणि काही सूचना दिल्या.
विमानतळ ते कस्तुरचंद पार्क, मौदा येथे हेलिपॅड ते कार्यक्रम स्थळ या मार्गावर रस्त्याच्या कडेला दुतर्फा तसेच कस्तुरचंद पार्क व मौदा येथील कार्यक्रमस्थळी लाकडी कठडे उभारले जात आहेत. उद्या सकाळपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तर विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम व पोलीस अधीक्षिका डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. कुठे कुणाला, किती जणांना तैनात करायचे, बंदोबस्त, धातुशोधक यंत्रे, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक, वाहतुकीचे नियोजन यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पोलीस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलीस व इतर गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचीही बैठक झाली.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कस्तुरचंद पार्क तसेच मौदा येथे येणार असून त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. दोनही कार्यक्रमस्थळी जमिनीचे सपाटीकरण तसेच व्यासपीठ उभारले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2014 at 08:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur ready to welcome prime minister narendra modi