नागपुरातून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह उत्तर प्रदेशातील बांदा येथे रेल्वेत सापडल्याने पोलिसानी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविण्यात आला आहे.
अनिल शिवसागर खुटेल (रा. कामगार कॉलनी) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे खजुराहो-कानपूर पॅसेंजरमध्ये ५ मार्चला त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने तसेच शवविच्छेदन अहवालातील नोंदीमुळे बांदा रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नागपूरला एमआयडीसी पोलिसांकडे हे प्रकरण सोपविले. वैद्यकीय अहवालानुसार पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचा तपास गुन्हे शाखेकडे आला आहे. अनिल नागपूरला रहात होता. मिळेल ते काम तो करीत होता. ३ मार्चपासून तो बेपत्ता होता. त्याच्या बांदा जिल्ह्य़ातील धवसर गावात राहणाऱ्या वडिलांनी बांदा पोलीस तसेच नागपूर पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची नोंद केली होती. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर व त्याचा कुणीतरी खून केल्याची तक्रार बांदा रेल्वे पोलिसांकडे केली. त्याला बांदा गावापूर्वीच कुणीतरी खून केल्याची शंका पोलिसांना आल्यामुळे त्यांनी हे प्रकरण तपासासाठी नागपूर पोलिसांकडे सोपविले. गुंतागुंतीचे प्रकरणा असल्याने या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे दिला. अनिलचे एका मुलीवर प्रेम होते, एवढाच दुवा पोलिसांच्या हाती आहे.  सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करीत आहे.
पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
रेल्वेच्या एका टीसीच्या खुनाप्रकरणी त्याच्या पत्नीविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवा नकाशा लष्करीबागेत २८ मे रोजी अकरा वाजताच्या सुमारास ही घट ‘निस्वार्थीपणा, ध्येयवाद हीच
भास्कररावांची जीवनगाथा’
ना घडली. हेरॉल्ड स्टिव्हन फ्रान्सवा हा अत्यवस्थ स्थितीत घरी आढळला होता. तो गंभीररित्या भाजला असल्याने स्वस्तिक क्रिटीकल केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ३ जूनला त्याचा मृत्ेयू झाला. पाचपावली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  छिंदवाडा येथे बदली करून घेण्याचा आग्रह त्याची पत्नी रजनी वारंवार करीत होती. यावरून २८ मे रोजी त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. तिने हेरॉल्डच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची तक्रार त्याची आई अ‍ॅग्नेस स्टिव्हन फ्रान्सवा हिने पाचपावली पोलिसांकडे केली. पोलिसांनी आरोपी रजनीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader