दोन दिवसांनी स्वीकारणार पदभार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित कुलसचिवपदी डॉ. अशोक गोमासे यांची नियुक्ती झाली. गेल्या २४ मार्चला कुलसचिवपदासह परीक्षा नियंत्रक, ग्रंथपाल आणि इतर पदांची जाहिरात देण्यात आली होती.
कुलसचिवपदी प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांच्या गटाचे डॉ. अशोक गोमासे यांनी बाजी मारली. या पदासाठी तब्बल १४ जणांनी अर्ज सादर केले होते. छाननी समितीने दोघांचे अर्ज रद्द केल्याने एकूण १२ जणांमध्ये कुलसचिवपदासाठी रस्सीखेच होती. त्यात यंग टिचर्स असोसिएशनचे सर्वेसर्वा डॉ. बबन तायवाडे गटाचे डॉ. अशोक गोमासे यांना कुलसचिवपदी विराजमान केले. दोन दिवसांनी गोमासे कुलसचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. या शर्यतीत प्रभारी कुलसचिव डॉ. महेशकुमार येंकी, शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. अशोक गोमासे, लोकप्रशासन विभागाच्या प्रमुख डॉ. नीलिमा देशमुख, वित्त व लेखाधिकारी पूरण मेश्राम, मागासवर्गीय सेलचे उपकुलसचिव विलास रामटेके, वध्र्याचे विकास शिंदे, वणीचे एस.आर. आसवले, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाचे डॉ. अरविंद जोशी, मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव दिनेश कांबळे, एम.ए. गायधने, विजय मोहकार आणि मिलिंद मेश्राम आदी १२ उमेदवार शर्यतीत होते.
मात्र आज झालेल्या मुलाखती दरम्यान डॉ. महेशकुमार येंकी आणि विजय मोहकार अनुपस्थित होते. गोमासे यांची कुलसचिवपदी नियुक्ती झाल्याने तायवाडे गटात फारच उत्साह होता. नियुक्तीप्रीत्यर्थ देण्यात आलेल्या पार्टीत सर्वानीच मोबाईल सायलेन्ट मोडवर ठेवून पार्टीत सर्वानी झोकून दिले. कुलसचिवपदाच्या निवड समितीत डॉ. के.सी. देशमुख, डॉ. अर्चना नेरकर, कुलगुरूंचे प्रतिनिधी व अधिष्ठाता डॉ. भरत मेघे, रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू, सुरत येथील तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. पोहरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा