– माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आम्ही सहज निमंत्रण दिले. त्यांना आमचा स्नेह लक्षात आला व त्यांनी निमंत्रण स्वीकारले. प्रणव मुखर्जींना कसे बोलवले ? व ते कसे जाणार ? ही सर्व चर्चा निरर्थक आहे.
– संघ संघ आहे, प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी आहेत, आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून प्रणव मुखर्जींची विचारधारा बदलणार नाही.
– कुठलाही भारतीय आम्हाला अस्पृश्य नाही. अनेकवर्ष आरएसएसचा कार्यक्रम असाच होत आहे. दरवर्षी आम्ही मान्यवरांना बोलवतो. त्यामुळे सध्या जी काही चर्चा, विरोध सुरु आहे त्याला अर्थ नाही.
– आपल्यात मतभेद असले तरी आपण सर्व भारतमातेची मुले आहोत. भारतीय नागरिकांमध्ये आरएसएस भेदभाव करत नाही.
– आम्हाला कुठलाही भारतीय अस्पृश्य नाही. विविधतेतील एकतेवर आरएसएसचा विश्वास आहे. भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे.
– राष्ट्र उभारणीत जेव्हा समाज सहभागी होतो तेव्हाच सरकार काही तरी करु शकते. स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी आपल्याला एकत्र काम केले पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. पण आता राजकीय मतभेदांमुळे आपल्यात अंतर निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
Dr Pranab Mukherjee ko humne sehej roop se amantran diya aur unhone humara sneh pehchan kar unhone sahmiti di. Unko kaise bulaya aur woh kaise ja rahe hain yeh charcha nirarthak hai: RSS Chief Mohan Bhagwat pic.twitter.com/5pkT4bmyvX
— ANI (@ANI) June 7, 2018
– प्रत्येकाचे राजकीय मत असते तो त्याचा अधिकार आहे पण विरोधाला पण मर्यादा असते. आपण सर्व त्याच देशाच्या भल्यासाठी काम करत आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. पण काही गटांचे स्वार्थी हेतू असतात. सरकार भरपूर काही करु शकते पण प्रत्येक क्षेत्रावर लक्ष ठेऊ शकत नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे.