जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे दहशतवाद्यांसाठी ढाल बनले होते, देशहितासाठी ते हटवल्या गेले. असे केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी नागपूर येथे राज्य विधी सेवा अधिकाऱ्यांच्या १७ व्या अखिल भारतीय बैठकीच्या उद्घाटनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी रवीशंकर प्रसाद म्हणाले की, सरकारने देशाबरोबरच जम्मू-काश्मीरच्या सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने कलम ३७० बाबत निर्णय घेतला. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की ही एक अस्थायी तरतूद होती व ती देशहितासाठी हटवण्यात आली.

आम्ही सदैव देश आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहोत. आमची इच्छा आहे की, जम्मू-काश्मीरची प्रगती व्हावी. कलम ३७० दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांसाठी ढाल बनले होते, मात्र आम्ही ते काढून टाकले.काश्मीरच्या विकासासाठी असे केले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.