एकलव्य क्रीडा मंडळ व महाराष्ट्र क्रीडा विकास संस्था यांच्यावतीने कै. नंदकुमार पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदापासून जिल्हास्तरीय किशोर-किशोरी खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन उद्या (शनिवार) व परवा (रविवारी) करण्यात आले आहे. खो-खो स्पर्धा निर्मलनगरमधील एकलव्य मंडळाच्या मैदानावर तर व्हालिबॉल स्पर्धा पाईपलाईन रस्त्यावरील दुर्गादेवी नय्यर शाळेच्या मैदानावर होतील. मंडळाचे सचिव निर्मलचंद्र थोरात यांनी ही माहिती दिली. नगरमधील क्रीडा संकृतीस चालना देण्यासाठी ‘श्रीजी’ उद्योगाच्या सहकार्यातून या स्पर्धा होणार आहेत. विजेत्यांना रोख स्वरुपाचे बक्षिस दिले जाणार आहे. खो-खोमध्ये मुलांच्या ९ व मुलींच्या ६ तर व्हॉलिबॉलमध्ये मुलांच्या १२ व मुलींच्या ६ संघाचा समावेश आहे. उद्घाटनास ज्येष्ठ क्रीडा समीक्षक वि. वि. करमरकर, क्रीडा चळवळीतील कार्यकर्ते भ्साकर सावंत, प्रशांत पाटणकर, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक मापुस्कर, राष्ट्रीय मार्गदर्शक राजेंद्र शिंदे आदी उपस्थित राहतील.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
नंदकुमार पवार स्मृती स्पर्धा आजपासून
एकलव्य क्रीडा मंडळ व महाराष्ट्र क्रीडा विकास संस्था यांच्यावतीने कै. नंदकुमार पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदापासून जिल्हास्तरीय किशोर-किशोरी खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन उद्या (शनिवार) व परवा (रविवारी) करण्यात आले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-03-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandkumar pawar memorial compitition from today