शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे (मुंबई) दिला जाणारा ले. जी. एल. नर्डेकर राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे यांना जाहीर झाला आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे मुळे हे सरचिटणीस आहेत. या संस्थेने अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर, अस्थिव्यंग अशा व्यक्तींना शिक्षक म्हणून नेमणूक देऊन त्यांच्या जीवनात स्वावलंबन निर्माण केले. मुळे यांच्या दूरदृष्टीपणातून ही संस्था प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. उद्या (रविवारी) सकाळी १० वाजता नागपूर येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

Story img Loader