मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खा. प्रताप सोनवणे, सभापती अॅड. नितीन ठाकरे, उपसभापती नाना दळवी, चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सर्वागीण विकासासाठी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी हा या स्पर्धेचा मूळ उद्देश असल्याचे नीलिमा पवार यांनी सांगितले. अॅड. ठाकरे यांनी अभ्यासाला खेळ व सांस्कृतिकतेची जोड मिळाल्यास व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो असे नमूद केले. प्रास्तविक शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी केले. आभार सी. टी. साळवे यांनी मानले. महाअंतिम स्पर्धेत वैयक्तिक वाद्य वादन व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेचे उद्घाटनही नीलिमा पवार आणि तबला वादक जयंत नाईक, नितीन पवार, हार्मोनियम वादक भक्ती बोरसे, शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बस्ते व सविता जाधव यांनी केले.
‘बिटको गर्ल्स’चे आज बक्षीस वितरण
येथील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रभाकर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी होणार आहे.
शैक्षणिक जीवनात खेळाचे अत्यंत महत्त्व असून, ते आयुष्यभर उपयुक्त ठरते. वैयक्तिक मूल्यमापनासाठी खेळाचा प्रारंभ झाला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. जास्तीतजास्त विद्यार्थिनींनी खेळात सहभाग नोंदवून प्रावीण्य मिळवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. खेळात सातत्य, सराव व परिश्रम घेण्याची तयारी असली तर यश हमखास मिळते. आरोग्यही चांगले राहते, असे विचार त्यांनी मांडले. उद्घाटनप्रसंगी राज्यस्तरीय खेळाडू धनश्री मिठगर व प्राजक्ता पाटील यांनी क्रीडा ज्योत आणली. या वेळी उपमुख्याध्यापिका जयश्री पेंढारकर यांसह उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच वासंती पेठे, क्रीडा विभाग प्रमुख सुभाष महाजन, शगुफ्ता शेख, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा