प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
विधान परिषदेचे माजी
सी
राजकारणात राहुनही शांतपणे आपले काम करणाऱ्या नगरसेविका अशी खरेतर सीमा हिरे यांची ओळख. आता त्या नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार झाल्या आहेत. कौटुंबिक राजकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या हिरे या स्वत: वाणिज्य पदवीधर आहेत. सलग तीन वेळा नगरसेवक, भाजपचे प्रदेश चिटणीस, समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा, इंडिपेंटन्स बँकेच्या उपाध्यक्ष, ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य आदींची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. राज्यात भाजपच्या बांधणीत ज्या नेत्यांचा सहभाग होता, त्यापैकीच एक असलेले ज्येष्ठ नेते दिवंगत पोपटराव हिरे यांची सून आणि स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीमार्फत राज्यात समर्थाच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देणारे डॉ. यशवंत पाटील यांची कन्या सीमा हिरे. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. वैविध्यपूर्ण विकास कामांची दखल घेऊन नाशिक सिटीझन फोरमने त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने सन्मानित केले. भाजपने सलग दोनवेळा पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पक्षाच्या माध्यमातून केली जाणारी आंदोलने, सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, मोर्चे यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. संघ परिवाराच्या नियमित उपक्रमांतही त्यांचा सहभाग असतो. सीमा हिरे यांचे पती महेश हे भाजप शहर उपाध्यक्षपदाची धूरा सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी समर्थ अभ्यासिका, गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय, वृक्षवल्ली उद्यान, समर्थ जॉगिंग ट्रॅक, आजी-आजोबा उद्यान, समर्थ बालोद्यान, ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र अशी अनेक नाविण्यपूर्ण कामे त्यांनी प्रभागात केली आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मेळ्याचे आयोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सलग १२ वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे.
बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व)
योगेश घोलप (देवळाली)
अनिल कदम (निफाड)
राजाभाऊ वाजे (सिन्नर)
छगन भुजबळ (येवला)
दीपिका चव्हाण (बागलाण)
निर्मला गावीत (इगतपुरी)
डॉ. राहुल आहेर (चांदवड)
जिवा पांडू गावित (कळवण)
आदिवासी भागातील शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीने बंधारे बांधणे, शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी कालवे तयार करण्याकडे प्राधान्यक्रमाने त्यांनी लक्ष दिले. घरपोहोच धान्य पुरवठा योजना त्यांनी आदिवासी भागात यशस्वीपणे राबविली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना करून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यंदाची निवडणूक धरून आतापर्यंत नऊ पैकी सात निवडणुकांमध्ये ते काम आणि जनसंपर्काच्या बळावर सातत्याने विजयी झाले आहेत.
आसिफ शेख (मालेगाव मध्य)
दादा भुसे (मालेगाव बा)
कालांतराने हिंदू नेता अशी त्यांची प्रतीमा पुढे आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढतांना राष्ट्रवादीचे प्रशांत हिरे व भाजपचे प्रसाद हिरे या दोघा चुलत बंधूंना पराभूत करून त्यांनी सर्वानाच चकीत केले होते. आमदारकी मिळविल्यावर सेनेत दाखल झालेले भुसेंनी २००९ च्या निवडणुकीत ही जागा कायम राखण्यात यशस्वी झाले. आता तिसऱ्यांदा विजय मिळवतांना गतवेळच्या तुलनेत त्यांच्या मताधिक्यात सात हजारांनी वाढ झाली आहे. गेल्यावेळी त्यांना सुमारे एक लाख तर त्यांच्या विरोधकास सत्तर हजार मते पडली होती. आता त्यांना ८२ हजार तर विरोधकास ४५ हजार मते पडली आहेत. पन्नास वर्षीय भुसे यांना मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील जनतेशी जुळलेली घट्ट नाळ या वैशिष्ठय़ांमुळे ‘हॅट्रिक’ करणे सहज सुलभ झाले.
पंकज भुजबळ (चांदवड)
अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे पंकज भुजबळ सलग दुसऱ्यांदा विधानसभेत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज हे शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळतात. शेती हा त्यांचा व्यवसाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी सदस्य व युवा कार्यकारिणीच्या कामात सहभाग नोंदविला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईचे उपाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्तपद ते सांभाळत आहेत. गरजु नागरिकांसाठी ग्रामीण विकास कार्यक्रम, गरीब व होतकरु तरुणांना मार्गदर्शन, महिला सबलीकरण तसेच व्यवसाय विषयक प्रशिक्षण कार्यक्रम असे उपक्रम त्यांनी राबविण्यासाठी पुढाकार घेतला.
श्री सिध्दीगणेश संस्था, भायखळा भाजीपाला मार्केट प्रिमायसेस सोसायटी, माझगाव सेवा सहकारी संस्था, शिवडी सेवा सहकारी संस्था या संस्थांचे ते सल्लागार म्हणून काम पाहतात. विद्यार्थी सेवा संघ, एसएससी सराव परीक्षा व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम, माझगाव मुंबई विभागात आरोग्य व नेत्रज्ञान शिबीर व विविध सामाजिक उपक्रमांचे त्यांनी आयोजन केले. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसताना गतवेळी ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. अर्थात. वडिलांचा अनुभव त्यांच्या कामी आला. वाचन, संगीत, क्रिकेट, फुटबॉल व टेनिस यांची विशेष आवड असणाऱ्या पंकज यांच्याकडे नांदगावकरांनी पुन्हा मतदारसंघाची धुरा सोपविली आहे.
नाशिक जिल्ह्य़ातील विजयी उमेदवारांचा परिचय
प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य) विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांची स्नुषा प्रा. देवयानी सुहास फरांदे या गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाच्या शैलीमुळे नाशिक …
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-10-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district winning candidates introduction