नाशिक एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक व शिक्षकेतरांचा हिवाळी वार्षिक क्रीडा महोत्सव संस्थेचे अध्यक्ष प्रा. सरूयकांत रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. सीडीओ मेरी हायस्कूल येथील प्रांगणात महोत्सवातील विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा समिती अध्यक्ष य. दा. जोशी, श्रीरंग वैशंपायन, शिक्षक मंडळ अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, उपाध्यक्ष राजेंद्र निकम, कार्यवाह शशांक मदाने, सकार्यवाह दिलीप अहिरे, एकनाथ कडाळे, तानाजी जाधव, सी. एम. कुलकर्णी व डी. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
क्रीडा हे व्यक्तीमत्व विकास व समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून खेळामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे प्रा. रहाळकर यांनी सांगितले. खेळामुळे व्यक्तीची सुदृढता वाढीस लागते. खिलाडूवृत्ती वाढते. सर्वानमध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण होऊन मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. सहनिमंत्रक राजेंद्र कापसे व मधुकर पगारे यांच्यासह संस्थेच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक य. दा. जोशी यांनी केले. या क्रीडा स्पर्धामध्ये संस्थेतील ४५० शिक्षकांनी सहभाग घेतला. वैयक्तीक व सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक विलास पाटील यांनी केले. आभार निमंत्रक विजय पाटोळे यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा