साहित्य-वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरण व मानव यांच्या परस्पर संबंधावर देवगिरी महाविद्यालयात दोनदिवसीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत ही परिषद उद्या (शनिवारी) व रविवारी होणार आहे. उद्घाटन राज्य सरकारच्या रेशीम उद्योगाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे यांच्या हस्ते होणार आहे.
परिषदेत डॉ. किरणसिंग राजपूत, प्रा. वानखेडे, डॉ. माहेश्वरी, प्राचार्य आर. टी. देशमुख यांची व्याख्याने होणार आहेत. यात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आदींनी केले आहे.   

Story img Loader