जिल्हा सायकल असोसिएशन, तसेच बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी (दि. २५) परभणीत अखिल भारतीय सायकल स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजता संपेल. स्पध्रेचा मार्ग विसावा फाटा-पेडगाव-मानवतरस्ता-सेलू फाटा-देवगाव फाटा-जिंतूर-बोरी-झरी-विसावा फाटा-गणपती चौक व जि.प.समोर समारोप होईल. स्पध्रेच्या विजेत्यांना ३१ हजार, २१ हजार, ११ हजार व ७ हजार रुपयांची पहिली चार बक्षिसे, तर परभणी जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी ४ हजार १००, ३ हजार १००, २ हजार १०० रुपये अशी ३ बक्षिसे, सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा फक्त पुरुष गटासाठी असून बी. रघुनाथ महाविद्यालयात प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत. स्पध्रेचे पारितोषिक वितरण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता होईल.
ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मदानावर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन होईल. माजी आमदार सुरेश देशमुख, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, महाराष्ट्र सायकल संघटनेचे सचिव प्रताप जाधव, डॉ. महेश देशमुख, खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार संजय जाधव, रामप्रसाद बोर्डीकर, मीरा रेंगे व बाबाजानी दुर्राणी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी आर. टी. ढोबळे ७६५३४००१०, प्रा. माधव शेजुळ ९४२२८७६८२५ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पध्रेचे कार्याध्यक्ष डॉ. विवेक नावंदर यांनी केले आहे.

Story img Loader