शहर सहकारी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील दोन पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. सन २०११-१२ मधील कामगिरीवर आधारीत ही पारितोषिके आहेत.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप अर्बन बँक्स व कर्नाटक फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शहर बँकेला ही पारितोषिके मिळाली. प्राप्तीकरपश्चात निव्वळ नफ्याचे एकूण मालमत्तेशी असणारे प्रमाण हा निकष लावून नफा क्षमता याकरता मध्यम बँकांच्या गटात शहर बँकेला पहिल्या क्रमाकांसाठीचा करंडक मिळाला.
ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी बँकेची तांत्रिक प्रगती करून उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल एक विशेष पारितोषिकही बँकेला देण्यात आले. अन्य कोणत्याही गटात कोणत्याही बँकेला असे विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आलेले नाही. संस्थापक संचालक मुकुंद घैसास यांनी बँकेच्या प्रगतीचेच हे द्योतक असल्याची भावना व्यक्त केली. विद्यमान अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी सन २०११-१२ मधील बँकेचे अध्यक्ष गिरीष घैसास व त्यांच्या सहकारी संचालकांच्या प्रभावी कामामुळे बँकेला हे सन्मान मिळाले असल्याचे सांगितले.

Story img Loader