किमान समान कार्यक्रमानुसार येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्या विद्यमाने १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. बी. गायधनी यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोटार वाहन अपघात दावे, भूसंपादन प्रकरण, प्रलंबित प्रकरणे, भारतीय चलनक्षम कायदा, फौजदारी व्यवहार संहितेखाली तडजोडी होऊ शकतील अशा कलमाखाली प्रकरणांचा निपटारा होणार आहे. गरजूंनी ठरावीक नमुन्यात अर्ज संबंधित विमा कंपन्यांकडे व न्यायालयाकडे २५ मार्चपर्यंत करावेत. सदर अर्जाची छाननी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे २० मार्चपर्यंत संबंधित विमा कंपनी व न्यायालय याद्या करून पाठवतील. गरजूंनी मुदतीच्या आत संबंधित कंपन्या व न्यायालयाकडे अर्ज करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा