नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्राचा पुरस्कार यावर्षी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रास नुकताच प्रदान करण्यात आला.
लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. देशातील ६३० कृषी विज्ञान केंद्रांची सातवी परिषद येथे आयोजित करण्यात आली होती. लोणी येथील पायरेन्सचे अध्यक्ष एम. एम. पुलाटे व केंद्रप्रमुख डॉ. भास्करराव गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय कृषी राज्यमंत्री चरणदास महंत, आयसीएआरचे महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन, उपमहासंचालक (कृषी विस्तार) डॉ. किरण कोकाटे, पंजाब कृषी विद्यपीठाचे कुलगुरु डॉ. बी. एस. धिल्लन आदी यावेळी उपस्थित होते. बाभळेश्वर केंद्राने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल पुरस्कार निवड करताना घेतली गेली. केंद्राने उपयोजित जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, गटसंघटन, तंत्रज्ञान आणि निविष्ठा, सल्ला सेवा या क्षेत्रात भरीव कार्य केले. याचा विनियोग शेतकरी वर्ग मोठय़ा प्रमाणात करीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या पुरस्काराबद्दल केंद्राचे अभिनंदन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा