राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यापीठ पातळीवरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून हा  सोहळा १२ मार्चला सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या गुरूनानक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मॅगसेसे सन्मानप्राप्त पद्मश्री निलिमा मिश्रा उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठ पातळीवर गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना पुरस्कार दिला जात असून यावर्षी १० कार्यक्रम अधिकाऱ्यांची आणि १० स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामात प्राध्यापक व स्वयंसेवकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहे. नागपूप विद्यापीठातंर्गत ३१४ विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभाग असून ३३ हजार विद्यार्थी आहेत. प्रत्येक महाविद्यालवयात नियमित कार्यक्रम सुरू असतात. शिवाय नागपूरच्या बाहेर ग्रामीण भागात शिबीर आयोजित केले जातअसून त्याठिकाणी श्रमदानासह विविध उपक्रम राबविले जातात.
राजेश गजघाटे (बिंझाणी महिला महाविद्यालय), डॉ. उल्हास मोगलेवार (गाडगे महाराज महाविद्यालय), डॉ. सुनील रामटेके (इंदिरा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय), डॉ. मोतीराम चव्हाण (भिवापूर महाविद्यालय), प्रा. अरविंद पाटील (अनिकेत समाजकार्य महाविद्यालय), प्रा. लुलेश्वर धरमसारे (विदर्भ महाविद्यालय लाखनी), प्रा. किशोर नागपुरे(मनोहरभाई पटेल महाविद्यालय), प्रा. बबन मेश्राम (एनएमडी कॉलेज गोंदिया), प्रा. इमॅन्यूअल कोड्रा (जनता महाविद्यालय चंद्रपूर) आणि राजेंद्र झाडे (केडीडी कॉलेज चामोर्शी) या कार्यक्रम अधिकाऱ्यांना तर रुपा हिवरे (ललित कला विभाग), निशांत गौतम (रामदेवबाबा इंजिनियरिंग कॉलेज), राजवंशी परचुरी (राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय), राकेश शुक्ला (लेमदेव पाटील कॉलेज मांढळ), सारिका उईके (समर्थ महाविद्यालय आष्टी), उत्तरा सिंगनजुडे (विदर्भ महाविद्यालय, लाखनी), प्रशांत पटले (एम.बी. पटेल कॉलेज गोंदिया), मोनाली बिट्टुरवार (एफई एस गर्ल्स हायस्कूल चंद्रपूर) आणि सुभाष मांदाडे (आदर्श महाविद्यालय देसाईगंज वडसा) या स्वयंसेवकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार उपस्थित होते.

Story img Loader