स्नेहालय संस्थेच्या‘सत्यमेव जयते उपक्रमाच्या प्रथम वर्धापनदिनानमित्त‘नैसर्गिक आपत्ती व अनैतिक मानवी वाहतूक’विषयावर प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत, १ व २ मे रोजी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम सत्राचे उद् घाटन सकाळी १० वाजता आमिर खान, अण्णा हजारे, डॉ. प्रवीण पाटकर, अभिजित पवार, स्वाती व सत्यजित भटकळ, लॅन्सी फर्नांडिस यांच्या उपस्थित होईल. दुस-या सत्रात दुपारी १२.३० वाजता अनैतिक मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या तिघींचे मनोगत व डॉ. पाटकर यांचे बीजभाषण होईल, त्यानंतर मुक्त संवाद होईल. तिस-या सत्रात दुपारी २ वाजता दुष्काळाची दाहकता, विस्थापन व मानवी तस्करी या विषयावर पत्रकार धनंजय लांबे (औरंगाबाद), रामबाबू भट (राजस्थान) यांची भाषणे व प्रतिनिधींचा खुला संवाद होईल. सायंकाळी चौथ्या सत्रात विविध राज्यांतील महिला प्रतिनिधींचा खुला संवाद होईल. रात्री ८ वाजता शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हा नाटय़प्रयोग होईल.
दुस-या दिवशी (दि. २) सकाळी ९ वाजता अनैतिक मानवी वाहतुकीस बळी पडलेल्यांशी संवाद नंतर सकाळी ११ ते १२.१५ दरम्यान समारोप होईल. या वेळी राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे राज्यातील दुष्काळाची सद्य:स्थिती व विस्थापन यावर भाषण होईल. डॉ. गिरीश कुलकर्णी ठराव व कृतिआराखडा सादर करतील.

Story img Loader