अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या निवडणुकीत पुणे विभागातील सहा जागांसाठी २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले
आहेत.
नाटय़ परिषद पुणे शाखेच्या कार्यालयामध्ये रविवारी या अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तीन जानेवारी
ही अंतिम मुदत असल्याची माहिती
पुणे विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष जानोरकर यांनी
दिली.
नियामक मंडळाच्या विद्यमान सदस्यांपैकी सुनील महाजन आणि आनंद कुलकर्णी यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विजय वांकर, योगेश सोमण आणि प्रकाश यादव हे तिघे निवडणुकीच्या िरगणामध्ये उतरलेले नाहीत. तर, शिरीष जानोरकर यांची पुणे विभागासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दोन पॅनेलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतचे अंतिम चित्र गुरुवारी (३ जानेवारी) स्पष्ट होईल.