सानपाडा, शिवाजीनगर, जुईपाडा, नेरुळ, शिरवणे गाव येथील हे १५ प्रभाग असून यात भाजपचा कस लागणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांच्या प्रभागात विद्या पावगे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना संगीता बोऱ्हाडे यांच्या बरोबर होणार आहे. त्यामुळे गायखे यांच्या दृष्टीने हे जागा निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी काँग्रेसची अनेक तिकिटे आपआपसात वाटून घेतली आहेत. पक्षाकडे खंबीर उमेदवार नसल्याने त्यांना दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे प्रभाग क्रमांक ७७ मधून त्यांची पत्नी वैजयंती यांची भाजपच्या उज्ज्वला बेल्हेकर यांच्याबरोबर होणार आहे. ही जागा भाजपला जाणीवपूर्वक देण्यात आली आहे. पालिकेचे पहिले सभागृह नेते जयवंत सुतार यांची राजकीय कारकीर्द प्रभाग क्रमांक ८१ मध्ये पणाला लागली असून त्यांची लढत नगरसवेक काशिनाथ पाटील यांच्या बरोबर होणार आहे. प्रभाग क्रमांक ८२ मध्ये १६ उमेदवार असून राष्ट्रवादीचे विजय साळे व सेनेचे विशाल ससाणे अशी लढत होणार आहे. नगरसेवक रंगनाथ औटी प्रभाग क्रमांक ८४ मधून नगरसेविका स्नेहा पालकर यांच्याबरोबर लढत देणार आहेत. यात भाजपचे बंडखोर दिलीप तिडके आपले नशीब आजमवणार आहेत. जयवंत सुतार यांचे पुतणे प्रभाग क्रमांक ८९ मध्ये सेनेच्या ज्ञानेश्वर सुतार यांच्याबरोबर सामना करणार असून ९० मध्ये मनीषा जवेरी व मीरा पाटील यांची लढत होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा