महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे नुकतेच कर्करोगामुळे लीलावती रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते अनंत सुतार यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. या वेळी सभागृह नेते अनंत सुतार, विरोधी पक्ष नेता सरोज पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, महापौर सागर नाईक यांनी प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण घेण्यामध्ये आर.आर.पाटील यांचे मोठा सहकार्य होते, असे महापौर सागर नाईक या वेळी म्हणाले. तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छताचा पुरस्कार हा आर.आर.पाटील यांच्यामुळेच मिळाला असल्याची आठवण करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा