नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत ऐरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसने व बेलापूरमध्ये भाजपने विजय मिळवला असला तरी यंदाच्या निवडणुकीत अपक्षांची मूठ बांधून रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या समीकरणांना मतदारांनी नोटाचे बटण दाबून नाकारले आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची अक्षरजुळणी केलेल्या उमेदवारांपेक्षा नोटाला नवी मुंबईकरांनी अधिक पसंती दिली आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात १६९७ तर बेलापूरमध्ये १९४४ मतदारांनी नोटाचे बटण दाबून मत नोंदवले आहे.
मागील वर्षांपासून निवडणुकांत नोटाचा अधिकार मतदारांना मिळाल्याने मतदारांना एक नवीन पर्याय निर्माण झाला आहे. आपल्याला नको असलेल्या उमेदवाराला नापसंतीचे बटण दाबून मतदारांनी ऐरोली व बेलापूर मतदारसंघात फुली मारली आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात समसमान नावाची जुळणी केलेल्या अपक्षांना एकत्र घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांना नोटाने चपराकच दिली आहे.
निवडणुकीत उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवाराच्या मताच्या तुलनेत नोटाला अधिक मते मिळाली आहेत. नोटाच्या मतदानाची संख्या पाहता राजकीय पक्षांना आधारवड ठरवणारी ही मते तटस्थ राहिल्याने नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे एकंदर चित्र आहे.
नवी मुंबईकरांची नोटाला अधिक पसंती
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत ऐरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसने व बेलापूरमध्ये भाजपने विजय मिळवला असला
First published on: 20-10-2014 at 12:28 IST
TOPICSनिवडणूक निकाल २०२४Election Resultsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महारिझल्टMAHRESULT
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai voters preferred nota option