शारदीय नवरात्रोत्सवाला करवीर नगरीत शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे आद्य शक्तीपीठ असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सिंहासनस्थ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली होती. गरुड मंडपाजवळ मुखदर्शनाची सोय केल्याने गर्दीवरील ताण कमी झाला होता. सायंकाळी सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या श्री मूर्ती आणण्यास सुरुवात झाली होती.
आदिशक्ती आणि स्त्री शक्तीच्या उपासनेचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सकाळी विधीवत घटस्थापनेची पूजा झाली. या वेळी संस्थानकाळापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार तोफेची सलामी देण्यात आली. दुपारी अंबाबाईची सालंकृत पूजा झाली. वैभवशाली आणि प्रसन्न रूपातील सिंहासनस्त महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली. पहिलीच पूजा अजित ठाणेकर, उमेश उदगावकर, गजानन जोशी, संजय सामानगडकर, मनोज ढवळे यांनी बांधली. उद्या श्री कन्याकुमारी देवी रूपामध्ये पूजा बांधली जाणार आहे, असे श्रीपुजक दत्तात्रय ठाणेकर यांनी सांगितले.
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. भाविकांना सुलभ रीत्या दर्शन घेण्यात यावे, याचे निजोजन केले होते. मंदिरात उभारण्यात आलेल्या मंडपात बॅरेगेटेड ला
शारदीय नवरात्रोत्सवास करवीरनगरीत प्रारंभ
राज्याचे आद्य शक्तीपीठ असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सिंहासनस्थ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-10-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratrotsav starts in kolhapur