अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व्यापारी संघटनेतर्फे भारनियमनाविरोधात महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा येताच भारनियमन करण्यात येऊ नये, असा संदेश प्राप्त झाला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन संपुष्टात आले. अर्जुनी मोरगाव तालुका नक्षलवादग्रस्त म्हणून जाहीर झाला असतानाही येथे दररोज सहा तास भारनियमन केले जात आहे. अर्जुनी मोरगाव व गोठनगाव फीडर वगळता इतरत्र भारनियमन केले जात नाही. भारनियमनामुळे विजेवर चालणारे लघुउद्योग बंद असतात. इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचन होते, मात्र भारनियमनामुळे वेळोवेळी धानपिकाला सिंचन होऊ शकत नाही.
भारनियमनामुळे व्यापारी व सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. या कारणांमुळे त्रस्त झालेल्या जनतेने १० एप्रिल रोजी महाराष्ट वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात सर्व पक्षांचे कार्यकत्रे उपस्थित होते. या निमित्ताने बाजारपेठ बंद होती. मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सहायक अभियंता भाजीपाले यांच्या कार्यालयात शिष्टमंडळ पोहोचले. त्या वेळी ते शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. उपस्थित जनसमुदायाचा राग अनावर झाला. त्यांनी कार्यालयासमोर लावलेले काही फलक तोडले, सूचना फलकाची काच फोडली, कार्यालयाबाहेर सुमारे तासभर रस्ता अडविला.
दरम्यान, तहसीलदार संतोष महाले यांना माहिती मिळताच ते म.रा.वीज वितरण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयाला मोच्रेकरांनी लावलेले कुलूप उघडले. सहायक अभियंता भाजीपाले व शिष्टमंडळाशी चर्चा केली. भाजीपाले यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यांनी अर्जुनी मोरगाव फीडर १० एप्रिलपासून या क्षेत्रात आल्याचे सांगून आजपासून भारनियमन बंद करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या. मोच्रेकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेतल्यामुळे मोच्रेकऱ्यांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
नक्षलवादग्रस्त अर्जुनी मोरगाव तालुका अखेर भारनियमनमुक्त
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व्यापारी संघटनेतर्फे भारनियमनाविरोधात महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा येताच भारनियमन करण्यात येऊ नये, असा संदेश प्राप्त झाला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन संपुष्टात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-04-2013 at 03:16 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalism affected arjuni morgaon taluka load shedding free at the last