पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी नारायण श्रीरंगी या आदिवासीची गोळय़ा घालून हत्या केल्याने गडचिरोली जिल्ह्य़ात दहशतीचे वातावरण आहे.  नक्षलवादी कमांडर रंजिता हिच्या अटकेनंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांना आवाहन दिले असून गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम गावात नक्षलवाद्यांनी काल पत्रके वाटून बदल्याची भावना व्यक्त केली. त्याचाच परिणाम नक्षलवाद्यांनी आदिवासींचे हत्यासत्र पुन्हा आरंभले आहे.
 सिरोंचा तालुक्यातील मोटला टेकडा या गावात नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री प्रवेश करून नारायण श्रीरंगी याच्या घरात प्रवेश केला. त्याला चौकात आणून गोळय़ा घालून ठार केल्यानंतर नक्षलवादी गावातून पसार झाले. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून श्रीरंगची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.    

Story img Loader